सातारा: ना. शिवेंद्रसिंहराजेमुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, इलेक्ट्रिक सायकलसह ८०३ वस्तूंचे दिव्यांगांना वाटप
Satara, Satara | Oct 17, 2025 दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी विविध उपक्रम राबवत आहे. समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'सेवा सुशासन पंधरवडा' आयोजित करण्यात आला असून यामध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून दिव्यांग बंधू भगिनींना इलेक्ट्रिक सायकल, व्हील चेअर यासह आवश्यक अशा ८०३ साहित्याचे वाटप करण्यात आले.