अकोला शहरात दिनांक २४ ऑक्टोबर सायंकाळी सुमारे ८ वाजता विजांच्या गर्जेत मुसळधार पाऊस झाला. एकाएकी आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली, जिल्हा माहिती कार्यालयाने हवामान खात्याच्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबरला देखील विजांच्या गर्जनासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.