चंद्रपूर: चांदा महसूल मित्र चॅटबोटचे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्घाटन
महसूल विभागाच्या विविध सेवा ऑनलाईन पध्दतीने नागरिकांना माहित व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या चांदा महसूल मित्र चॅटबोटचे (फोन नं. 9284061588) उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि. 20 सप्टेंबरला 3 वाजता करण्यात आले.यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.