केळापूर: पहापळ येथे जुगार अड्ड्यावर छापा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या पथकाने पहापळ ते केगाव रोडवरील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या कारवाई पोलिसांनी रोख रक्कम मोबाईल फोन दुचाकी वाहने आणि जुगाराचे साहित्य असा ऐकून एक लाख 76 हजार 260 किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलिसांनी दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी केली आहे.