जालना: बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी; जालन्यात वंचित आघाडीचा निषेध
Jalna, Jalna | Apr 25, 2026 बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ जालना शहरात संतापाची लाट उसळली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित आमदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या नेतृत्वाखाली जालना महानगरपालिका कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर “शिवाजी कोण होते” या पुस्तकाचे वाचन करून इतिहासाची योग्य माहिती समाजापर्यंत पोहोच