अंबरनाथ: अंबरनाथ येथील नवीन नाट्यगृहाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन
अंबरनाथ येथे नव्याने नाट्यगृह उभारण्यात आले आहे. या नाट्यगृहाला लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे अशी मागणी केली जात आहे. अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे या मागणीसाठी आज दुपारच्या सुमारास नव्याने उभारलेल्या नाट्यगृहासमोर मातंग समाज आणि वेगवेगळ्या संस्थांनी एकत्र येऊन आंदोलन केले आणि घोषणाबाजी करत मागणी केली.