जालना: वन खात्यात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे दोघे ताब्यात; बनावट प्रशिक्षण आदेशही दिले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalna, Jalna | May 23, 2026 वन खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणाची लाखोंची फसवणूक करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 3 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवार दि. 23 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणार्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. उमेश विजयकुमार जाधव रा. खांडवी, ता. परतूर, जि. जालना यांना आरोपींनी वन खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते.15 लाख रुपयांत नोकरी लावणार होता.