चांदूर रेल्वे: पळसखेड शिवाजी चौक येथे युवकास काठीने मारहाण ;चार जनाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
विजय कारंडे वय वर्ष 32 राहणार पुसद यांनी चार जनाविरुद्ध चांदोर रेल्वे पोलिसात तक्रार दिली आहे. विजय हा पानठेला वर उभा असताना झामा कारंडे यांनी फोन केला व कुठे आहे विचारले. काही वेळात त्या ठिकाणी झामा कारंडे ,शंकर कारंडे, नारायण कारंडे ,भीमराव कारंडे त्या ठिकाणी आले व विजय याला काठीने डोक्यावर पोटावर हातावर मारून जखमी केले अशी तक्रार विजयाने पोलिसात दिली आहे. तेव्हा चार जनाविरुद्ध पोलिसांनी विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.