अरुणोदय' अभियानांतर्गत जनजागृती सिकलसेलमुक्तीसाठी पोलिस अधीक्षकांचे नागरिकांना आवाहन गोंदिया जिल्ह्याला सिकलसेलमुक्त करण्याच्या उद्देशाने तसेच नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी 'अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान' प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासनामार्फत माहिती, शिक्षण व संवाद उपक्रमांसह व्यापक जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे.