दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात सुद्धा यंत्रणा अलर्टवर आल्या असून वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम,रेल्वे स्थानक परिसराचा सुरक्षा यंत्रणेने डॉग स्कॉडसह पाहणी करत आढावा घेतला आहे,सेवाग्राम बापू कुटी आश्रम तेच पवनार येथे विनोबाजिंच आश्रम असल्याने मोठ्या प्रमाणात दुरवरून पर्यटक वर्ध्यात येत असतात,त्याच अनुषंगाने वर्ध्यातील सुरक्षा यंत्रणा कुठलिही अनुचित प्रकार घडू नये या करिता सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.