समुद्रपूर: गिरड येथे शाळेच्या पहिल्या दिवशी गावात प्रभातफेरी काढून जनजागृती करीत विद्यार्थ्यांचे करण्यात आले स्वागत
समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथील जिल्हा परिषद कन्या शाळा व जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या सयुक्त विद्यमाने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती आपुलकी व पालकामंध्ये जनजागृती करण्यासाठी गावात प्रभातफेरी काढण्यात आली.यावेळी शाळेत विद्यार्थी पोहचात त्यांना गुलाबाचे फुले देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.या जनजागृती प्रभातफेरी मध्ये दोन्ही शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शिक्षण, शिक्षिका सहभागी झाले होते.