समुद्रपूर: शेडगाव चौरस्त्यावर गांजा वाहतूक करणाऱ्या नागपुरातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले,१ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त
समुद्रपुर तालुक्यातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील शेडगाव चौरस्त्यावर वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा अंमली पदार्थाची विक्रीसाठी वाहतुक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 1लाख 29 हजार 680 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून मोहम्मद सरफराज अख्तर अब्दुल सत्तार अंन्सारी, वय 38 वर्ष, राहणार नागपुर,शकिल बाबा खान, वय 48 वर्ष, राहणार नागपुर यांना अटक केली.