पालघर: वसई येथे भारतीय जनता पक्ष वसई पूर्व दक्षिण मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
भारतीय जनता पक्षाच्या वतीने वसई पूर्व व दक्षिण मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक वसई येथे आयोजित करण्यात आले. भाजपच्या नवनिर्वाचित वसई विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत संघटनात्मक बांधणी आगामी कार्यक्रम स्थानिक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांशी जिल्हाध्यक्षांनी संवाद साधला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे वसई पूर्व व दक्षिण मंडळातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.