वाशिम: अनसिंग येथील मंगलेश्वर महादेव मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक
Washim, Washim | Sep 17, 2025 वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील मंगलेश्वर महादेव मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त निरोगी आयुष्यासाठी अभिषेक व महाआरती करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून महादेवाचा अभिषेक करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी कार्यकर्त्यांनी साकडे घातले.