बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यान बांधण्यात येणाऱ्या वादग्रस्त रस्ता दुभाजकाविरोधात जनविकास सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. जीवघेणे खड्डे असलेल्या या रस्त्यावर दुभाजक नव्हे तर तात्काळ रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी आज दि.28 ऑक्टोबर 4 वाजता मनपा कडे निवेदनातून केली आहे.