नगर: अतिवृष्टीमुळे पुरात मयत झालेल्या तरुणाच्या भावाला शासकीय सेवेत घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पाथर्डी तालुक्यातील शिरपूर येथील एका भूमिहीन दलित कुटुंबांना अतिवृष्टीमुळे जीव गमावलेल्या मुलाच्या भावाला शासकीय सेवेत घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे रिपब्लिकन सेनेच्या वतीने हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले शिरपूर येथील रहिवासी रावसाहेब शेलार यांचा मुलगा अतुल रावसाहेब शेलार हा सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पुलामध्ये वाहून गेला तीन दिवसानंतर म्हणजेच 23 सप्टेंबरला त्याचा मृतदेह तिसगाव मिळाला