हातकणंगले: इचलकरंजीतील खड्ड्यांच्या समस्येबाबत युवा महाराष्ट्र सेनेचे महापालिकेत घेराव आंदोलन
इचलकरंजी शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येबाबत युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने आज मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता महानगरपालिकेला निवेदन देत तीव्र आंदोलन करण्यात आले.शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे.या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.