30 ऑक्टोबरला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे कपिल नगर अंतर्गत येणाऱ्या इंग्लिश स्कूल रॉय उद्योग स्कीमच्या मागे अज्ञात आरोपी एक्टिवा दुचाकी ने आले आणि तीन बॅटरी चोरून घेऊन गेले. आरोपी हे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून हे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कपिल नगर पोलीस करीत आहे. दरम्यान आरोपी रेकी करून ही चोरी केल्याचे बोलले जात आहे याबद्दलचा अधिक तपास पोलीस करीत आहे.