उर्वरित नगरपंचायत प्रभाग निवडणुकीत तसेच निकालाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात काटोल उपविभागातील 154 आरोपींची परेड घेण्यात आली. ज्यामध्ये कुख्यात आरोपींचा समावेश होता.