नागपूर ग्रामीण: वाडीतील हनुमान मंदिरात चोरीची घटना; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तावाडी येथे असलेल्या हनुमान मंदिरात चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने मंदिर परिसरात प्रवेश करून तेथील शिवलिंगावर स्थापित असलेल्या नाग देवतेच्या मूर्तीची चोरी केली आहे. या घटनेनंतर मंदिर समितीने वाडी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.