भंडारा: विषारी औषध प्राशन केलेल्या मरेगाव येथील तरुणीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
एका 22 वर्षीय तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पूजा अमोल भेंडारकर (वय 22, रा. मरेगाव) असे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मरेगाव येथील पूजाने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तिला तिच्या कुटुंबियांनी पालांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता तिचा मृत्यू..