**इगतपुरीत मतदान यंत्रांवर कडाक्याच्या थंडीत कडक पहारा** इगतपुरीत मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी कडाक्याच्या थंडीत पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा कक्षेबाहेर शेकोटी करून पहारा दिला जात असून एसआरपीएफ, इगतपुरी पोलीस, नगर परिषद कर्मचारी व अग्निशमन दल तैनात आहेत. परिसरात 13 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत 51 उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी पाहणी केली आहे. मतमोजणीची तारीख जवळ येत असल्याने 70 नगरसेवकपद व चार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची धाकधूक व