केज: केज येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मेन रोड वरून विराट मोर्चा काढण्यात आला
Kaij, Beed | Sep 19, 2025 ओबीसी आरक्षण बचावासाठी केज येथे विराट मोर्चा :केज तालुक्यात आज ओबीसी आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व लक्ष्मण हाके यांनी केले. आरक्षणावर कुणीही गदा आणू नये, तसेच समाजाच्या हक्काचे आरक्षण अबाधित राहावे, या मागणीसाठी ओबीसी बांधव एकत्रित आले होते.मोर्चामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी समाजाचे बांधव, महिला व युवक सहभागी झाले होते. हातात फलक, बॅनर, घोषणाबाजी करत या मोर्चाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला.