पालघर: नालासोपारा- साई बाजार परिसरात चप्पल गोदामांना लागली आग
नालासोपारा येथील साई बाजार परिसरात चप्पल गोदामांना आग लागल्याची घटना घडली आहे. एका चप्पल गोदामाला आग लागली. त्यानंतर काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले आणि आग बाजूच्या चप्पल गोदामांमध्ये देखील पसरली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व पथक प्रयत्न करत अग्निशमन दालाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही दिवसांनी झालेली नाही. या आगीत चार चप्पल गोदामे व साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.