मतिमंद मुलाला बेदम मारहाण, मांडकीतील निवासी विद्यालयात धक्कादायक प्रकार
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 3, 2025
आज दिनांक 3 ऑक्टोंबर सकाळी 8 वाजता छत्रपती संभाजीनगर मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात लहान मुलावर अमानवी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यालयातील शिपाई दीपक इंगळे याने एका मतिमंद विद्यार्थ्याचे हात बांधून कुकरच्या झाकणाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तसेच केअरटेकर प्रदीप देहाडे याच्यावरही इतर विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे आरोप आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा करण्यात आले असून, चिकलठाणा पोलिसांनी संबंधितांविरुद्ध