उत्तर सोलापूर: पूनम गेटवर शिवसेनेचा ‘कुंभकर्ण’ आंदोलनाचा थाट; झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी शेतकऱ्यांचा अनोखा निषेध...
पूनम गेट येथे झोपलेले सरकार जागवण्यासाठी शिवसेना (उबाठा गट) तर्फे गुरुवारी दुपारी 12 वाजता कुंभकर्ण आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीस न्याय मिळावा, मदत त्वरीत जाहीर करावी या मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी झोप घेऊन प्रतीकात्मक आंदोलन केले. या आंदोलनाद्वारे सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जागं व्हावं, अशी मागणी करण्यात आली.