वरोरा: जागतिक गोंड सगा मंडळ, वरोरा यांचा आदिवासी आरक्षणावरचा निर्णय विरोधासाठी वरोरा तहसील कार्यलयात निषेध
महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्यासाठी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, बंजारा, विमुक्त व भटक्या जमाती आणि धनगर समाजालाही तेच लागू करून त्यांना आदिवासी प्रवर्गाचे आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीवर आदिवासी समाजाचा तीव्र विरोध आहे आणि शासनाने असे केल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा आज दि 17 सप्टेंबर ला 12 वाजता वरोरा तहसील कार्यालयात निषेध करून देण्यात आला आहे.