अकोट: भर दिवाळीला तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा;सोंगणीच्या सोयाबीनचे नुकसान;पावसामुळे दिवाळी बाजारात धावपळ
Akot, Akola | Oct 21, 2025 भर दिवाळीच्या दिवशी अकोट तालुक्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला दुपार पासून तर संध्याकाळपर्यंत सुरू असणाऱ्या पावसामुळे दिवाळी सणावर पावसाचे गडद सावट होते तर शेती पिकांमध्ये सोंगुन ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसानची प्राथमिक माहिती समोर येत आहे दिवाळीच्या दिवशी आलेल्या पावसामुळे दिवाळीच्या बाजारात किरकोळ विक्रेत्यांची मोठी धावपळ झाली.काही ठिकाणी पावसामुळे विक्रेत्यांचे नुकसान झाले असून ग्राहकीतील वर्दळ देखील नगण्य झाल्याने यंदाच्या दिवाळीवर संकटांची मालिका सुरू असल्याचे ग्राहकांनी सांगीतले.