बारामती: उंडवडी कडेपठारमध्ये भरदिवसा चोरी; रोकड व सोन्याचे दागिने लंपास
Baramati, Pune | Oct 21, 2025 उंडवडी कडेपठार (ता. बारामती) हद्दीतील तळपट्टी येथील अशोक श्रीरंग जराड यांच्या घरात भरदिवसा चोरीची घटना (सोमवारी) दुपारी दोनच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी घराचे कुलूप आणि कोयंडा तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाट फोडले व घरातील २४ हजार रुपये रोकड तसेच सुमारे एक तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला.