जालना: प्रियदर्शनी कॉलनी संभाजीनगर येथे महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र सुरू करा; भाजपाची महापालिका आयुक्ताकडे मागणी
Jalna, Jalna | Oct 9, 2025 जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी, संभाजी नगर लक्कडकोट परिसरात महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केली. गुरुवार दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी केली. जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी, संभाजी नगर, लक्कडकोट, पासी चौक, कांबळेचा मळा, माणिक नगर, शिवाजी नगर म्हाडा कॉलनी,ढवळेश्वर,शेर सवार कॉलनी,भोकरदन नाका,सकलेचानगर,जिजामाता कॉलनी आदींना फायदा होईल.