मकर संक्रांतीच्या आधी अजनी पोलिसांनी नायलॉन मांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींवर मोठी कार्यवाही केली आहे 22 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता च्या सुमारास अजनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ई रिक्षा ने नायलॉन मांजाची चक्री नेणाऱ्या 2 आरोपीना अजनी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपींकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आल्या आहे आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.