एरंडोल: कासोदा दरवाजा राम मंदिरासमोरील महादेव मंदिरात गेलेली २१ वर्षीय तरुणी बेपत्ता, एरंडोल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार
एरंडोल शहरात कासोदा दरवाजा हा भाग आहे.या भागात श्रीराम मंदिर आहे. या मंदिरासमोरील रहिवाशी अक्षदा राजेंद्र चौधरी वय २१ ही तरुणी आपल्या घरी सांगून गेली की मी महादेव मंदिरात जात आहे. असे सांगून घरून निघालेली तरुणी नंतर घरी परत आलीच नाही. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.