जिल्ह्यात अमली पदार्थांची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्क राहून तपासण्यांचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता अमली पदार्थ प्रतिबंध समन्वय समितीची बैठक पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सीमा झावरे, उपवनसंरक्षक नम्रता ताले, सहायक आयुक्त संतोष पोवराज, समाजकल्याण सहायक आयुक्त मारोती वाठ आदी अधिकारी उपस्थित होते.