गेवराई: तालुक्यातील सुशी येथे घरफोडी झाल्याची घटना घडली पाच लाख 70 हजाराचा ऐवज लंपास केला
Georai, Beed | Oct 18, 2025 : घराच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरातील शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला मारहाण करत घरात प्रवेश करुन सोन्याचांदीच्या दागिन्यांसह नगदी रोकड असा एकूण पाच लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.गेवराई तालुक्यातील सुशी येथे घडली. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.