चिखलदरा: तालुक्यातील लोणाझरी शेतात वाघाचा कहर; वाघाने गाभण मशीचा घेतला बळी
दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चिखलदरा तालुक्यातील लोणाझरी शिवारात वाघाने हल्ला करून शेतकरी बळीराम बगाजी येवले यांच्या शेतातील गाभण मशीला ठार मारले.गेल्या एका महिन्यात या परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या सात घटना घडल्या असून त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दिली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. गावापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.