पवनी: नगरपरिषद अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल: नगराध्यक्षा डॉ. विजया ठाकरे
Pauni, Bhandara | Jan 15, 2026 शहराच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्यासाठी पवने नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेची नगराध्यक्षा डॉ. विजया ठाकरे यांनी 15 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी अभ्यासिकेतील आसनव्यवस्था, प्रकाशयोजना, उपलब्ध पुस्तके आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.