जालना: परतूरमध्ये हॉटेलच्या कॅबिनमध्ये बसण्यावरून वाद; अपंग ऑटो रिक्षा चालकाला चौघांकडून लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण*
Jalna, Jalna | May 22, 2026 हॉटेलच्या कॅबिनमध्ये जेवण करत असताना 'कॅबिन लवकर रिकामी कर' असे म्हणत एका अपंग ऑटो रिक्षा चालकाला जातीवाचक/अपमानास्पद शब्द बोलून, लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना परतूर येथे सेलू रोड साईबाबा येथे घडली आहे. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अली हसन मोहम्मदी (वय ३८, रा. परकोटा गल्ली, जुन्या पोलीस स्टेशनजवळ, परतूर) हे ऑटो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवार, दिनांक १९ मे २०२६ र