सर्व घटकांचा विकास साधण्याच्या उद्देशाने आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या भाजपा सरकारच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून विहिरगांव येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज दि.११ नोव्हेंबर ला ५ वाजता राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. जिल्ह्यातील विहिरगांव येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते कवडू भसारकर यांनी आमदार देवराव भोंगळे यांचे नेतृत्वात भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.