राजूरा: माजी आ.ऍड. वामनराव चटप यांच्या विरोधात फेसबुकवर बदनामीकारक पोस्टप्रकरणी विरूर स्टे.येथे शेतकरी संघटनेचे निषेध निदर्शने
माजी आ. ऍड. वामनराव चटप यांच्या विरोधात फेसबुकवर करण्यात आलेल्या बदनामीकारक पोस्टप्रकरणी समाजमनात संताप निर्माण झाला. या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी व कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते, शेतकरी, युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकरी संघटनेतर्फे विरूर स्टे. येथे आज दि. २१ सप्टेंबरला १२ वाजता निषेध निदर्शने दिले.