मुरुड: जोरदार पावसामुळे होड्या किनाऱ्यावर ,मासळीची आवक घटल्याने मासळीचे भाव वधारले
Murud, Raigad | Aug 18, 2025 कोकणातील ७२० किलोमीटर सागरी किनाऱ्यावर मागील दोन दिवस पासून जोरदार पाऊस पडत आहे.त्यामुळे छोट्या बोटीने मासेमारी करणाऱ्या बोटी किनारीवर परतल्या आहेत.मासळीचा खूप चांगला हंगाम सुरु असताना मागील काही दिवसापासून मुसळधार पावसाचे संकट कोसळले आहे.सुरुवातीच्या काळात ओले बोंबील व कोलंबी याची मोठी आवक झाली होती.तदनंतर काही दिवसांनी पापलेट सुद्धा मोठ्या पट्टीत सापडले होते.