बारामती: बारामतीत सायकलस्वराला डंपरची जोरदार धडक, वृद्ध व्यक्तीचा मृत्यू; नागरीकांमध्ये संतापाचं वातावरण
Baramati, Pune | Sep 29, 2025 डंपरखाली चिरडल्या गेल्याने एका वृद्धाने आपले आयुष्य गमावले आहे. सदरचा अपघात बारामती शहरातील फलटण चौक, येथे दुपारी सव्वा बारा वाजता घडल्याची माहिती आहे. या अपघातात मारुती उमाजी पारसे (वय 75, रा. आनंदनगर, बारामती जि. पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.