पनवेल: शेलघरमध्ये ढोल-ताशांच्या गजरात विजयी रॅली नवनिर्वाचित सभापती-उपसभापतींचा सत्कार
Panvel, Raigad | Mar 16, 2026 "अनेक वर्षांची मेहनत, परिश्रम आणि कार्यकर्त्यांच्या पुण्याईमुळेच यश मिळाले आहे अशी भावना भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सभापती रंजना वास्कर आणि उपसभापती भूपेंद्र पाटील यांच्या जाहीर सत्कार समारंभावेळी व्यक्त केले. तसेच पक्षात काम करणाऱ्याला नक्कीच संधी मिळते, हीच आपली शिकवण आहे. जोपर्यंत अंगात ताकद आहे, तोपर्यंत जनतेची सेवा अविरतपणे सुरूच राहील असे प्रतिपादन ही त्यांनी यावेळी केले. पनवेल पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती रंजना वास्कर आणि उपसभापती भूपेंद्र पाटील यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.