गज्या मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यावर मुंबई पुणे रोडवर रॅली काढण्यात आली होती. रॅलीत सहभागी झालेल्या गजा मारणेच्या गुंडांवर पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण पोलीसांनी विविध गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी गज्या मारणेचा राईटहँड सुनिल नामदेव बनसोडे हा फरार झाला होता. वारजे पोलिसांनी त्याला काल अटक केली.