पाथरी तालुक्यातील तुरा शिवारात ढालेगाव येथील दीपक अतकरे यांच्या शेतातील उसाला विद्युत घर्षणामुळे आग लागल्याची घटना नऊ डिसेंबरला सकाळी 11:00 च्या सुमारास घडली. या आगीत अतकरे यांचा साडेचार एकर ऊस जळून खाक झाला आहे.त्यात लाखोंचे नुकसान झाले आहे.महावितरण विभागाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकरी अतकरे यांनी केली आहे