धुळे: सोशल मीडियावरील प्रेमसंबंधाचे गंभीर परिणाम; बाळापूरसह विविध ठिकाणी विवाहितेवर लैंगिक अत्याचार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Oct 21, 2025 धुळे जिल्ह्यात सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे गंभीर परिणाम समोर आले आहेत. एका विवाहित महिलेनं राहुल कोळीविरोधात वारंवार लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत ११ जुलै ते १७ ऑगस्टदरम्यान विविध ठिकाणी अत्याचार करून तिचे खासगी व्हिडिओ शूट केले आणि धमक्या दिल्या. पोलिसांनी राहुल कोळीसह समाधान व कान्हा या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.