वणी: विवाहितेचा सासरकडून शारीरिक व मानसिक छळ, नागपूर येथील घटना तीन जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Oct 13, 2025 शहरातील एका भागात माहेरी राहणाऱ्या विवाहित महिलेने आपल्या पतीसह सासू व दिरावर शारीरिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याहून गंभीर म्हणजे, फिर्यादी महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीने विवाहानंतर एकदाही तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले नाहीत. उलट पती, सासू आणि दिर यांनी नेहमी पैशांची मागणी करत तिला मानसिक त्रास दिल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.