केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे व मंत्री संजय सावकारे यांच्या निवडणुकांमध्ये आम्ही जीवाचे रान केले असतांना आता मी नगराध्यक्ष झाल्यावर यांनी साधा अभिनंदनाचा फोनही केला नाही. यामुळे हे नेते लहान मनाचे होय !'' असा घणाघाती हल्ला वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी चढविला. जामनेर येथे रविवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर बोलत ते होते.