पालघर: अवैध वैश्याव्यवसायावर बोईसर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तीन पीडित महिलांची सुटका
बोईसर नवापूर नाका परिसरातील सहारा हॉटेल येथे अवैध वैश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला, बनावट ग्राहक पाठवून हॉटेलमध्ये अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खातरजमा केली. त्यानंतर सदर ठिकाणी छापा टाकत वैश्याव्यवसाय करण्यास जबरदस्तीने प्रवृत्त केलेल्या तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी व्यवस्थापक विनय धूपर याच्याविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आला आहे.