पातुर तालुक्यातील चान्नी पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. शेजारच्या काकूसोबत शेतात गेलेली मुलगी "मी शौचास जाते, तुम्ही घरी जा" असे सांगून निघून गेली, मात्र त्यानंतर ती परतली नाही. बराच शोध घेऊनही मुलगी सापडली नसल्याने आईने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, चान्नी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.