नागपूर ग्रामीण: फ्लॅटचे दार उघडे राहणे पडले महागात, ४ लाखांची रोकड आणि दागिन्यांसह ६.६६ लाखांचा ऐवज लंपास
बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नरेंद्र नगर येथे एका फ्लॅटचे उघडे दार साधून अज्ञात चोरट्याने चोरी केली. संदीप विद्याधर शुक्ला (वय ३७) हे रात्री जेवण करून आल्यावर घराचे दार न लावताच कुटुंबासह झोपले होते. या दरम्यान चोरट्याने घरात शिरून लोखंडी कपाटातून ४ लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. बेलतरोडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.